सांगली ः थोडक्यात पोलिस वृत्त

सांगली ः थोडक्यात पोलिस वृत्त
Published on

विद्यापीठात शुक्रवारपासून
फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे शुक्रवार (ता. १०) ते गुरुवार (ता. १४) दरम्यान फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह होणार आहे.
या सप्ताहाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी प्रा. सुकुमार कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचिंतन’ या विषयावर व्याख्यान होईल. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी साडेदहा वाजता प्राचार्य जी. पी. माळी यांचे ‘महात्मा जोतिराव फुले यांचा मानवतावादी सत्यधर्म’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम होणार असून सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक व पूजन आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता डॉ. प्रशांत बनसोडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले.

अन्य कार्यक्रम असे...
प्रा. रमेश जाधव यांचे व्याख्यान
रविवार (ता. १२) सकाळी ः १०.३०

डॉ. प्रकाश कांबळे लिखित ग्रंथावर परिसंवाद
सोमवारी (ता. १३) सकाळी १०.३०
सायंकाळी साडेपाच ः कबीर नाईकनवरे यांचा ‘सलाम संविधान’ कार्यक्रम

कोल्हापूरच्या पर्यटकाचा
सोनवी नदीत बुडून मृत्यू
संगमेश्वर ः कोल्हापूरहून कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीपात्रात पोहण्यास उतरलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली. संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बोरगे हा त्याचा मावस भाऊ विनोद मोहन कलकुटकी (वय ४४) आणि इतर मित्रांसह मोटारीने संगमेश्वर येथील मित्र सागर याच्या आजोळी फिरण्यास आले होते. दुपारच्या वेळी र्व मित्र लोवले येथील सोनवी नदीपात्रात पोहण्यास गेले होते. नदीकिनारी जेवणाची जय्यत तयारी केली होती. जेवण तयार होईपर्यंत पोहण्याचा आनंद घेऊ, या विचाराने सर्वजण पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अजित बोरगे पात्रात खोलवर बुडू लागला. त्यांना पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय नेले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com