

rat7p4.jpg-
35828
चिपळूण : ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध समस्यांबाबत निवेदन दिले.
------------
चिपळुणात परीक्षेच्या काळात
वीजपुरवठा वारंवार खंडित
नागरिकांमध्ये संताप ; ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा
चिपळूण, ता. ७ : शहरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर आता ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. चिपळूण येथील उपकार्यकारी अभियंता कॅरमकोंडा यांना सोमवारी शिवसैनिकांनी शहरातील वीजसमस्येबाबत निवेदन देत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली.
सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा काळ सुरू असताना वीज खंडित होण्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच अस्थमासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले यांना कडक उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
निवेदन देताना शहरप्रमुख सचिन कदम, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना शहराधिकारी पार्थ जागृष्टे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेविका वैशाली कदम, विभागप्रमुख सावळाराम सातपुते, कार्यकर्ते संतोष मिरगल, विभागप्रमुख परेश साळवी उपस्थित होते. स्मार्टमीटरच्या सक्तीविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांवर कोणतीही योजना बळजबरीने लादू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. वारंवार होणाऱ्या वीजखंडिताचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा ठाकरे शिवसेनेच्यावतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.