रत्नागिरी ः आखाती युद्धामुळे ग्रामीण भागातील गणेशमुर्ती चित्रशाळेवर परिणाम

रत्नागिरी ः आखाती युद्धामुळे ग्रामीण भागातील गणेशमुर्ती चित्रशाळेवर परिणाम
Published on

35938

rat7p7.jpg-
35839
रत्नागिरी ः गणेशगुळे येथील डी-आर्ट गणपती कलाकेंद्रात तयार असलेल्या सुबक गणेशमूर्ती.
-rat7p6.jpg-
35838
रत्नागिरी ः मूर्तिकार ज्ञानेश कोटकर
----------------
अमेरिकावारीसाठी सज्ज गणेशमूर्ती अडकल्या
आखाती युद्धाचा फटका; चित्रशाळांवर परिणाम, दीड ते दोन लाखाचे नुकसान
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : कागदी लगदा व शाडूमातीपासून तयार करण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी ओळख असलेल्या गणेशगुळे येथील मूर्तिकार ज्ञानेश कोटकर यांच्या गणेशमूर्ती यंदा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात पाठवणे रखडले आहे. अमेरिकेसाठी तयार केलेल्या सुमारे ५० सुबक गणेशमूर्ती चित्रशाळेतच अडकून पडल्या असून, दीड ते दोन लाख रुपयांच्या नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी गणेशोत्सव १४ ते १९ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गणेशगुळे येथील वडिलोपार्जित डी-आर्ट गणपती कलाकेंद्रात कोटकर दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतात. जिल्ह्यासह परजिल्हा आणि अमेरिकेत त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी असते. दरवर्षी सुमारे ५५० गणेशमूर्ती तयार करून विविध ठिकाणी पाठवल्या जातात.
२०२५ मध्ये शाडू मातीमिश्रित कागदी लगद्याच्या ४४ गणेशमूर्ती अमेरिकेत पाठवल्या होत्या. या कलाकेंद्रामुळे वर्षभर ५ ते ६ कारागिरांना रोजगार मिळतो, ज्यामध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे. कागदी लगद्यापासून मूर्ती तयार करण्यासाठी कागद भिजवणे, त्यावरील डिजिटल थर काढणे, शाडू माती मिसळणे आणि साच्यातून विविध पोझमधील मूर्ती घडवणे अशी दीर्घ प्रक्रिया पार पाडावी लागते. तयार मूर्ती हलक्या व पर्यावरणपूरक असल्याने परदेशात पाठवण्यास सोयीस्कर ठरतात. विशेष पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये भाताच्या पेंडीसह सुरक्षित पॅकिंग करून त्या न्हावाशेवा बंदरातून अमेरिकेत पाठवल्या जातात; मात्र यंदा युद्धजन्य परिस्थितीमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे.

कोट
डी-आर्ट गणपती कलाकेंद्रातून जिल्ह्यासह परजिल्ह्यात आणि अमेरिका येथे गणेशमूर्तींना मागणी होती. त्यासाठी एप्रिलमध्ये चित्रशाळेत गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. आखाती देशात नोंदणी सुरू झाली आहे; मात्र आखाती देशातील युद्धामुळे गणेशचतुर्थीपर्यत गणेशभक्तांच्या हातात पोचतील की, नाही अशी शंका निर्माण झाली आहे. अद्यापही सुबक गणेशमूर्ती चित्रशाळेतच आहेत.
- ज्ञानेश कोटकर, मूर्तिकार, गणेशगुळे

एक नजर
गणेशमूर्ती रखडल्याची मूर्तिकाराची खंत
डी-आर्ट कलाकेंद्राच्या मूर्तींना देश-विदेशात मागणी
एप्रिलमध्येच मूर्ती तयार
आखाती युद्धामुळे निर्यात प्रक्रिया अडथळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com