लांजा-उड्डाणपुलाखालील मार्गाच्या मागणीला हरताळ

लांजा-उड्डाणपुलाखालील मार्गाच्या मागणीला हरताळ
Published on

उड्डाणपुलाखालील मार्गाच्या मागणीला हरताळ
लांज्यात फिरताना होणार गैरसोय; भरावाच्या भिंतीचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः लांजा शहर समन्वय समितीच्या रेट्यानंतरही तहसील कार्यालयासमोर महामार्गावर उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाला (अंडरपास ब्रिज) मंजुरी मिळालेली नाही.‌ त्यामुळे लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी असलेल्या तहसील, पंचायत समिती, पोलिस ठाणे, तालुका पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक रजिस्टर ऑफिस या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे कठीण होणार आहे. सध्या या ठिकाणी महामार्गाच्या भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अंडरपास ब्रिजच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. परिणामी, लांजा शहर आणि तालुक्यातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.‌
शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयासाठी येत असतात; पण या ठिकाणी अंडरपास न ठेवल्याने रस्त्याची विभागणी होणार आहे. पंचायत समितीमधून तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, हायस्कूलकडे जायचे झाल्यास मोठा वळसा घालावा लागणार आहे तसेच पंचायत समिती, ग्रामीण रुगणालय, झेरॉक्स सेंटरकडे जाण्यासाठी खूप लांबचा वळसा घालावा लागणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर अंडरपास ब्रिज होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन लांजा शहर समन्वय समितीने उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या मार्गाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. कारण, ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे पिलर संपतात त्या साटवली रोड तिठ्यापासून भरावाची भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.‌

कोट
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अंडरपाससाठी येथील नागरिकांनी रेटा लावला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त आश्वासन देऊन जनतेची मते आपल्या पदरात पाडून घेतली. आता जनतेची ही झालेली गैरसोय कोण सोडवणार ?
- सचिन लिंगायत, शिवसेना ठाकरे गट

कोट
अंडरपासची मागणी येथील जनता वारंवार करूनसुद्धा येथील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या लोकप्रतिनिधींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
- अभिजित राजेशिर्के, तालुकाप्रमुख, युवासेना ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com