देव्हारेतील बाजारात ''आगोट''ची तेजी

देव्हारेतील बाजारात ''आगोट''ची तेजी
Published on

-Rat७p२०.jpg-
26O35913
मंडणगड ः देव्हारे येथे ‘आगोट बाजार’ची दमदार सुरुवात; स्थानिक शेतकऱ्यांना नवी संजीवनी
------
देव्हारेतील बाजारात ‘आगोट’ची तेजी
स्थानिक शेतकऱ्यांना नवसंजीवनी; वाहतूकखर्चातही बचत
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः देव्हारे येथे सुरू झालेल्या आगोट बाजाराला परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा बाजार स्थानिक अर्थकारणाला चालना देणारा ठरत आहे. आठवडा बाजाराच्या धर्तीवर सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
परिसरातील गोठे, धामणी, बोरखत, नायणे, कोन्हवली, वडवली, मालेगाव, कलकवणे आदी गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येथे सहभागी होत आहेत. शेतातून थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचत असल्याने वाहतूक खर्च कमी होत असून, त्याचा फायदा ग्राहकांनाही वाजवी दराच्या स्वरूपात मिळत आहे. बाजारात टोमॅटो, वांगी, मटार, पावटे, मेथी, कोथिंबिरीसारख्या ताज्या भाजीपाल्याला विशेष मागणी दिसून आली. दुकानांच्या तुलनेत कमी दरात भाजी उपलब्ध होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सकाळच्या सत्रातच अनेक शेतकऱ्यांचा माल विक्री होऊन जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याशिवाय मसाले, लोणचे, पापड, कपडे, सुकामाल अशा विविध वस्तूंचीही विक्री होत असून, महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योगांनाही या बाजारामुळे नवे व्यासपीठ मिळत आहे. देव्हारे येथील आगोट बाजार हा केवळ खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू न राहता, स्वयंपूर्ण गावांच्या संकल्पनेला बळकटी देणारा उपक्रम ठरत आहे.
-----
कोट
आगोट बाजारामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला चांगली मागणी असून, सकाळीच विक्री पूर्ण होते. त्यामुळे शेतीत नवे प्रयोग करण्याचा आत्मविश्वास मिळतो.
- सुरेश मोडकले, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com