-अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे थकित मानधन जमा

-अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे थकित मानधन जमा
Published on

अंगणवाडी सेविकांचे
थकीत मानधन जमा
रत्नागिरी, ता. ८ : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांना तीन महिन्यांचे थकीत मानधन जमा झाले आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मानधनाचा प्रश्न निकाली निघाला असून सेविका, मदतनीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाकडून उशिराने येणारा निधी मार्चअखेरीस प्राप्त झाल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. याचा थेट लाभ जिल्ह्यातील ५ हजार ३७५ सेविका, मदतनिसांना झाला आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २ हजार ७७२ अंगणवाडी सेविका आणि २ हजार ६०३ मदतनीस आहेत. त्यांना मानधनाचा थेट लाभ झाला आहे. अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनिसांना ७ हजार ५०० रुपये मानधन मिळते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com