

३५९५१
दापोली कृषी विद्यापीठाच्या
कुलसचिवपदी उमेश चांदिवडे
आठ वर्षांनंतर नियमित पदामुळे कामकाजाला गती
चिपळूण, ता. ७ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी चिपळूण तालुक्यातील खडपोली गावचे सुपुत्र आणि मंत्रालयातील उपसचिव उमेश चांदिवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळाल्याने प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.
उमेश चांदिवडे कार्यक्षम आणि धोरणी प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. कृषी विभागात त्यांनी नऊ वर्षे उल्लेखनीय कार्य केले असून, या काळात बियाणे प्रक्रिया, ग्राम बीजोत्पादन, सेंद्रिय शेती, परंपरागत कृषी विकास योजना आणि जमीन आरोग्यपत्रिका यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ठसा उमटवला आहे. कृषी, नियोजन आणि गृह यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांत काम केल्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची आणि पारदर्शक निर्णयक्षमतेची दखल घेत मंत्रालयातून त्यांची थेट विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्चपदावर कार्यरत असूनही चांदिवडे यांनी गावाशी आणि मातीशी असलेली नाळ कायम जपली आहे. खडपोली गावी त्यांचे नियमित येणे-जाणे असते. कोकणातील शेतीची त्यांना खडानखडा माहिती असून, गावी आल्यावर ते स्थानिक शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. विद्यापीठाचा ''कुलसचिव'' हा प्रशासनाचा कणा मानला जातो. विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि वित्तीय व्यवहारांत समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे.
चौकट
राज्यपालांच्या हस्ते सन्मान
कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राज्यशासनाचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न'' (२०२१) हा पुरस्कार देऊन चांदिवडे यांना २९ सप्टेंबर २०२४ ला राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान त्यांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.