वेताळबांबर्डेतील ''सेल्फी पॉईंट'' लक्षवेधी

वेताळबांबर्डेतील ''सेल्फी पॉईंट'' लक्षवेधी
Published on

swt83.jpg
36092
वेताळबांबर्डे ः सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

वेताळबांबर्डेतील ‘सेल्फी पॉईंट’ लक्षवेधी
गावच्या सौंदर्यात भर ः वेतोबा क्लब, ‘पावणाई’ मंडळाची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः वेताळबांबर्डे गावच्या सौदंर्यात एक सेल्फी पॉईंटची भर पडली असून, गावाच्या स्वागत नाक्यावर हा आकर्षक सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरत आहे.
वेताळबांबर्डे गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व पावणाई टेंब राधा नृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वेंगुर्ले गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच शैलेश घाटकर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष आनंद भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, दशरथ कदम, डॉ. राजन राणे, कानू शेळके, दीपक खरात, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे उपस्थित होते. वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व आदिशक्ती अभियानात केलेली कामगिरी कौतुकास्पद असून गावची एकी गावची खरी ताकद असल्याचे गौरवोद्गार सभापती नाईक यांनी काढले.
ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात केलेल्या सुधारणा व बदल संपूर्ण जिल्ह्यात लक्षणीय व चर्चेत असल्याचे श्री. वालावलकर यांनी सांगितले. अवधूत सामंत व प्रदीप गावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com