पतंजली योग समितीतर्फे प्रमोद कामत यांचा सत्कार

पतंजली योग समितीतर्फे प्रमोद कामत यांचा सत्कार
Published on

swt810.jpg
36102
सिंधुदुर्गनगरी ः पतंजली योग समितीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार करण्यात आला.

पतंजली योग समितीतर्फे
प्रमोद कामत यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ८ ः पतंजली योग समिती, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद येथे आयोजित या सत्कारप्रसंगी पतंजली योग समितीमार्फत जिल्हाभरात होत असलेल्या योगप्रचार आणि प्रसाराविषयी चर्चा करण्यात आली. योगाचा प्रचार आणि प्रसार जिल्हाभरात करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही श्री. कामत यांनी दिली. यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास उर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे, पतंजलीचे कार्यकर्ते रवींद्र वालावलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com