आरडीसीसीचा एकूण व्यवसाय ६ हजार कोटीवर

आरडीसीसीचा एकूण व्यवसाय ६ हजार कोटीवर
Published on

-rat8p15.jpg-
P26O36129
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे बँकेविषयी माहिती देताना. सोबत
उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक अॅड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, राजन सुर्वे, कालेकर, गजानन पाटील आदी.
-----------
‘आरडीसीसी’चा व्यवसाय सहा हजार कोटींवर
डॉ. तानाजीराव चोरगे ः निव्वळ नफा ३२ कोटी रुपये
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंतचा एकूण व्यवसाय ६ हजार कोटीवर पोचला आहे. निव्वळ नफा ३२ कोटी ९ लाख रुपये इतका झाला आहे. ही बँक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम जिल्हा बँक आहे, असे बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
या वेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक अॅड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, राजन सुर्वे, कालेकर, गजानन पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्ष चोरगे म्हणाले, २००७ मध्ये बँक जेव्हा तोट्यात होती तेव्हा बँकेचा एनपीए १९.८३ टक्के इतका जास्त होता; मात्र, कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनामुळे आज बँक सलग १८ वर्षांपासून नफ्यात असून, गेल्या १४ वर्षांपासून बँकेचा नक्त एनपीए ० टक्के आहे. बँकेला सलग १५ वर्षांपासून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत आहे. बँकेने २०२३-२४ या वर्षात सहकारी संस्थांना ३० टक्के लाभांश दिला आहे. बँकेचे भागभांडवल ७३ कोटी ६२ लाख रुपये आहे. बँकेचा स्वनिधी ३८९ कोटी १८ लाख रुपये, ठेवी ३ हजार २५७ कोटी १४ लाख रुपये, कर्ज २ हजार ४९८ कोटी २५ लाख रुपये आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ५ हजार ८५५ कोटी ३९ लाख रुपयांवर पोचला आहे. बँकेचा निव्वळ नफा ३२ कोटी ९ लाख रुपये झालेला आहे. नऊ तालुक्यांमध्ये ७५ शाखा असून, त्यातील २६ शाखा स्वमालकीच्या आहेत. जिल्ह्यात १९ एटीएम सेंटर असून, दुर्गम भागातील ग्राहकांसाठी ३ ‘मोबाईल एटीएम व्हॅन’ कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com