

-ratchl८१.jpg-
26O36156
मुंबई ः शिवसेनेत कार्यकर्त्यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
----------
चिपळूणमध्ये संघटन बळकट होणार
एकनाथ शिंदे ः खतातेंच्या हाती धनुष्यबाण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः उमेश खताते यांच्यासारख्या जमिनीशी जोडलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशाने चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल. त्यांच्या पाठीशी पक्ष संपूर्ण ताकदीने उभा राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाकरे गटाचे चिपळूण युवासेनेचे तालुकप्रमुख उमेश खताते यांनी मशालीची साथ सोडत शिवसेनेचे (शिंदे गट) धनुष्यबाण हाती घेतले. मंगळवारी (ता. ८) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमेश खताते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती देसाई, इक्बाल बेबल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमीत भुरण, दीप्ती सावंत-देसाई, संदेश शिगवण, संतोष मिरगल आदींसह साडेतीनशेहून अधिक कार्यकर्ते मुंबईत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.