राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी रईस अलवी

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी रईस अलवी
Published on

- rat9p3.jpg -
26O36251
चिपळूण : येथील रईस अलवी यांना नियुक्तीचे पत्र देताना शशिकांत शिंदे
----
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक
जिल्हाध्यक्षपदी रईस अलवी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाच्या आढावा बैठकीत निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या वेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी सहअध्यक्ष सोहेल सुभेदार, अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख अफजल फारूक, प्रदेश कार्याध्यक्ष मुजाहिद खान, वारीस पठाण, प्रदेश उपाध्यक्ष रहेमान खान पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com