

-rat९p१.jpg-
26O36249
रत्नागिरी ः प्लास्टिकमुक्तीबाबत नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली.
-rat९p१७.jpg-
26O36310
रत्नागिरी ः साळवी स्टॉप येथे टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक असल्याने आग लावल्यानंतर त्याचा धूर सर्वत्र पसरतो.
--------
रत्नागिरी शहराचा ‘प्लास्टिकमुक्ती’चा निर्धार
पालिका-व्यापाऱ्यांची बैठक; निकृष्ट कॅरिबॅगवर बंदी, नियमभंगावर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आता कंबर कसली असून, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आपला मोर्चा ‘प्लास्टिकमुक्ती’कडे वळवला आहे. शहरात प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने व्यापारी महासंघासोबत बैठक घेतली. यामध्ये नगरपालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहर स्वच्छतेच्या या लढाईत सहभागी होण्याची ग्वाही दिली.
रत्नागिरीत झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला नगरपालिकेतर्फे व्यापाऱ्यांना प्लास्टिकबंदीच्या तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासाठी एक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पर्यावरणासाठी घातक ठरणारे प्लास्टिक आणि शासनाने बंदी घातलेल्या वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वैधतेबाबत आणि उपलब्ध पर्यायांबाबत काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या. बाजारात कोणत्या पिशव्या नियमानुसार वापरता येतील, याबाबत व्यापाऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी नगरपालिकेतर्फे लवकरच ‘नमुना पिशव्यांसह’ आणखी एक विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य पर्यायांची निवड करणे सोपे होईल.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकबाबत कठोर भूमिका जाहीर केली. अतिशय हलक्या आणि कमी दर्जाच्या प्लास्टिक कॅरिबॅगवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. अशा पिशव्यांची विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निकृष्ट प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
---
लोकसहभागातून संकल्प
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत केले असून, पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाची ही धडाकेबाज मोहीम आणि त्याला मिळणारा लोकसहभाग पाहता, रत्नागिरी शहर लवकरच ‘प्लास्टिक फ्री’ होईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
----
कोट
ही मोहीम केवळ प्रशासकीय नसून ती शहरहिताची एक सामाजिक चळवळ आहे. रत्नागिरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- शिल्पा सुर्वे, नगराध्यक्षा, रत्नागिरी
----
दृष्टिक्षेपात...
* कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई
* नमुना पिशव्यांचे लवकरच विशेष सत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.