कोळोशी येथे वह्यांचे वाटप

कोळोशी येथे वह्यांचे वाटप
Published on

36503

कोळोशी येथे वह्यांचे वाटप
नांदगाव : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कोळोशी येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी -हडपिड, कोळोशी अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ व वह्या वाटप केल्या. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप, माजी सरपंच सुचिता पोकळे, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी चव्हाण, मुख्याध्यापिका सारिका पवार, विशाखा तांबे, शिक्षिका मुंडे, स्मित गुरव, छोटू खोत, पत्रकार उत्तम सावंत, चंद्रकांत इंदप, विजय इंदप आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com