

swt107.jpg
36506
अणाव : येथे आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी विद्यार्थी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक.
रक्तदान शिबिराला अणाव येथे प्रतिसाद
अणाव : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मानव साधन विकास संस्था ग्रुप ऑफ हेल्थ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास विद्यार्थी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे आयोजन सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या विशेष सहकार्याने केले होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती थोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. थोंबरे यांनी रक्तदानापूर्वी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेबाबतही सविस्तर माहिती दिली. या शिबिरास अणाव उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी विद्याधर तांबे यांनीही उपस्थित राहून आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सहकार्य केले. जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ आणि परिचारिकांच्या टीमने रक्त संकलनाचे काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. यावेळी योगेश प्रभू, प्राचार्या नेहा जाधव, प्राचार्य डॉ. सतीशकुमार, अजित देसाई उपस्थित होते.