

तारकर्लीतील साई मंदिराचा
उद्यापासून वर्धापन दिन
मालवण, ता. १० : तारकर्ली येथील ग्राम श्री साई मंदिर मंडळ, मुंबई संचलित श्री साई मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा १२ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. या निमित्ताने तीन दिवस धार्मिक विधी, पालखी सोहळा, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१२ एप्रिल रोजी उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता ''साई पादुका अभिषेक'' होईल. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत महिला व लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. रात्री ८.३० वाजता ''दर्यावर्दी कला क्रीडा भजन मंडळ, तारकर्ली'' यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पादुका अभिषेक झाल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता गावातून श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ७.३० वाजता साईंची आरती होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता ''झुंझार भजन मंडळ, तारकर्ली'' यांची सेवा रुजू होईल, तर रात्री ९.३० वाजता गावातील मुलांचे रेकॉर्ड डान्स पार पडतील. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पादुका अभिषेक आणि ९ ते १२ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा होईल. दुपारी १२ वाजता आरती होऊन १२.३० वाजल्यापासून साई भंडारा सुरू होईल.
सायंकाळी ५ वाजता ''श्री महापुरुष महिला भजन मंडळ (खालची वाडी)'' आणि ६.३० वाजता ''श्री महापुरुष महिला भजन मंडळ (वरची वाडी)'' यांचे भजन होईल. रात्री ७.३० वाजता महाआरती झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले दोन महिला संघांतील ''डब्बल जंगी भजन बारी'' रंगणार आहे.