वाचन संस्कृती जोपासण्याचे प्रयत्न

वाचन संस्कृती जोपासण्याचे प्रयत्न
Published on

36715

वाचन संस्कृती जोपासण्याचे प्रयत्न

डॉ. तोरसकर ः मालवणात सामाजिक समता सप्ताह

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर येथे वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन डॉ. ज्योती तोरसकर यांनी बॅ. नाथ पै सेवांगण येथे केले.
सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग बार्टी व बॅ. नाथ सेवांगण मालवण यांच्या वतीने सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत साने गुरुजी वाचन मंदिर येथे सलग वाचन उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी सौ. तोरसकर बोलत होत्या. यावेळी पत्रकार अमित खोत, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, डी.एड्. कॉलेज प्रा. नागेश कदम, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, समाज कल्याण विभागाच्या शिल्पा अमरे, चैत्राली फाटक, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, प्रसाद यंदे, दिलीप रेडकर, नरेंद्र जामसांडेकर, गौरी केळूसकर आदी उपस्थित होते. सलग वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांना साने गुरुजी वाचन मंदिर येथील उपलब्ध पुस्तकांचे वाचन करायचे होते. त्यानुसार डी. एड. कॉलेज मालवणच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले. यावेळी प्रा. नागेश कदम यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ या पुस्तकाबाबतचे विवेचन केले, तर प्रा. ज्योती तोरसकर यांनी महात्मा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. समतादूत संग्राम कासले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com