

rat११p२.jpg-
26O36685
:विद्यालयाची इमारत
निकम विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता.११ : खासगी शाळा विभागात सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, टप्पा तीन या अभियानामध्ये हा पुरस्कार मिळाला.
या शाळेने सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी केले. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांचा यामध्ये समावेश होता. ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आले. या अभियानामध्ये विद्यालयाने सहभाग नोंदवून शालेय व सहशालेय उपक्रमाचे सादरीकरण केले. भाग ‘अ’ पायाभूत सोयीसुविधा, भाग ‘ब’ शासन ध्येयधोरण अंमलबजावणी, भाग ‘क’ शैक्षणिक संपादणूक या मुद्द्यांची पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी केली.
या अभियानात विद्यालयाने पहिल्या वर्षी विभागस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून १५ लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले आहे. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक व तिसऱ्या वर्षी विभागात प्रथम क्रमांक प्राप्त करून २१ लाख रुपये पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्षा युगंधरा राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत निकम डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरूद्ध निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे अध्यक्ष शांताराम खानविलकर आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.