ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
Published on

आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषद
दापोली महाविद्यालयात उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ११ ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचा वनस्पतिशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ‘रिसर्च इंटरवेन्शन्स अँड अ‍ॅडव्हान्समेंट इन प्लांट सायन्सेस’ या विषयावर आधारित या परिषदेत भारत आणि परदेशातील २२०हून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
उद्‍घाटन दापोली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिषदेच्या ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट बूक’चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी जैवविविधता संवर्धनामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका मोलाची असल्याचे सांगत संशोधकांना मार्गदर्शित केले. प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी संशोधन क्षेत्रातील नव्या संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला तर वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. रघुनाथ घालमे यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. ८८ संशोधकांनी आपल्या संशोधन प्रबंधांचे मौखिक सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com