‘बंदी’ आदेश उल्लंघनप्रकरणी वैभववाडीत १५ पासून उपोषण

‘बंदी’ आदेश उल्लंघनप्रकरणी
वैभववाडीत १५ पासून उपोषण
Published on

‘बंदी’ आदेश उल्लंघनप्रकरणी
वैभववाडीत १५ पासून उपोषण

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः बंदी आदेश असताना नेर्ले येथील धावजी देवस्थानमध्ये प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ दोघांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नेर्लेतील दोन महिला १५ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार आहेत.
नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या वार्षिक होळी उत्सवावरून काही वाद निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अहवालानंतर तहसीलदारांनी शिमगोत्सव कालावधीत २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीसाठी बंदी आदेश लागू केला होता. हा आदेश लागू असताना गावातील दोघांनी ७ मार्चला सायकांळी सहाच्या सुमारास मंदिरात प्रवेश केल्याचा आक्षेप नीलम नवनाथ पांचाळ आणि आरती भालचंद्र सुर्वे या दोन महिलांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी १६ मार्चला पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे केली; मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे १५ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तशी कल्पना त्यांनी तहसीलदार आणि पोलिस विभागाला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com