

डिंगणे शाळेत १८ एप्रिलला
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः डिंगणे येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा क्र. १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि ‘सांस्कृतिक कलामंच’ उद्घाटन सोहळा १८ एप्रिलला आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सदस्य प्रियंका देसाई, तसेच शिवगणेश प्रॉडक्शनचे गणेश ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या ऐतिहासिक साधनांच्या प्रदर्शनाने होणार असून सकाळी ९ वाजता आजी-माजी शिक्षकांचा सत्कार, १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, रात्री ८ वाजता रंगमंच उद्घाटन व सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे रात्री ९ वाजता शिवगणेश प्रॉडक्शन, मुंबई-सिंधुदुर्गतर्फे ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘इथे ओशाळला मृत्यू’ सादर केला जाणार आहे. परिसरातील सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नाना सावंत, उपाध्यक्ष यशवंत डिंगणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर सावंत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.