

36874
वाढत्या उन्हापासून पशुधनाचा बचाव करा
पशुसंवर्धन विभाग ; पाणी व खाद्य वेळेत द्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः एप्रिल आणि मे महिन्यातील वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे जनावरांची प्रकृती बिघडू नये आणि दुग्धोत्पादनात घट होऊ नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे जनावरांची भूक मंदावते, ज्यामुळे त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. विशेषतः म्हशींना त्यांच्या काळ्या रंगामुळे आणि शरीरातील कमी घामग्रंथींमुळे गायींच्या तुलनेत उष्णतेचा अधिक त्रास होतो. हा धोका टाळण्यासाठी योग्य आहार आणि व्यवस्थापन आवश्यक आहे. पशुपालकांनी गोठ्याची उंची पुरेशी असावी जेणेकरून हवा खेळती राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. छताला पांढरा चुना लावावा किंवा त्यावर पालापाचोळा, गवत टाकावे. कडक उन्हाच्या वेळी गोठ्याभोवती ओले बारदाणे किंवा शेडनेट लावावेत. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच
जनावरांना पिण्यासाठी नेहमी थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या, पाण्यातून इलेक्ट्रोलाइट्स द्यावेत, आहारात मिठाचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा, दुधाळ जनावरांना संतुलित पशुखाद्यासोबतच ''मिनरल मिक्स्चर'' (खनिज मिश्रण) द्यावे अशा सूचना पशूपालकांना दिल्या आहेत.
चौकट
लक्षणे दिसल्यास संपर्क साधा
जिल्ह्यात कोणत्याही जनावरामध्ये उष्णतेच्या ताणाची किंवा आजाराची लक्षणे दिसल्यास, पशुपालकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.