

नर्सिंग कॉलेजमध्ये
समता सप्ताह उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समता, बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले होते. या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रोल प्ले (नाट्य सादरीकरण) यांचे आयोजन केले होते. या सर्व उपक्रमांमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर आधारित प्रभावी सादरीकरण केले. या समता सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समता, न्याय आणि बंधुभाव या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची जाणीव या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.