रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेकडून अभियान

रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेकडून अभियान
Published on

रत्नागिरीत जनतेच्या प्रश्‍नांवर
शिवसेनेचे संवाद अभियान
रत्नागिरी, ता. १२ ः सर्वसामान्य नागरिक, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्यासाठी शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा युवाधिकारी आठवड्यातील ठराविक वारी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावणार आहेत. प्रशासकीय आणि जनसंपर्कासाठी विशेष नियोजनरत्नागिरीतील यशोधन अपार्टमेंट, अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संपर्क कार्यालयात हे नेते उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी विनायक राऊत यांनी वेळापत्रक निश्चित केले आहे. दर सोमवारी जिल्हा परिषद सदस्या नेहा रविंद्र माने, दर बुधवारी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य संतोषजी थेराडे, शुक्रवारी युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत हे कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना आणि इतर सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे. सामान्य जनतेची शासकीय कामे असोत वा स्थानिक समस्या, त्या सोडवण्यासाठी हे सर्व नेते एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. याचा शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com