

rat12p6.jpg-
36819
रत्नागिरी ः भंडारी फाऊंडेशन जिल्हास्तरीय एकांकिकेत प्रथम क्रमांक पटकावणारी भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या पैठणी या एकांकिकेचा चमू सोबत फाऊंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर.
----------
कीर विधी महाविद्यालयाची ''पैठणी'' एकांकिका प्रथम
जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा ; ''प्रेम की यातन'' ला दुसरा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः येथील भंडारी फाऊंडेशन तर्फे स्वातत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या ''पैठणी'' या एकांकिकेने बाजी मारली. तर दिग्दर्शन, प्रकाश योजना व अभिनय अशा तीन वैयक्तिक पारितोषिके पटकावली. द्वितीय क्रमांक मधुमिलिंद प्रतिष्ठानच्या ''प्रेम की यातना'' या एकांकिकेला मिळाला. राजयोग कलामंच मुचरी (ता. संगमेश्वर) यांच्या ''कुबडा तू बडा'' या एकांकिकेने पटकावला.
शुक्रवारी (ता. १०) सकाळी जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भंडारी फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, प्रमुख पाहुणे जेष्ठ रंगकर्मी दत्ता बोरकर, ज्येष्ठ अभिनेते अभय खडपकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील, दशरथ रांगणकर, परीक्षक ज्येष्ठ रंगकर्मी सौ. अनुया बाम, अजित पाटील, अमोल रेडीज आदी उपस्थित होते.
स्पर्धेत ८ एकांकिका संघ सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सहभागी तरुणांनी एकांकीसाठी वेगवेगळे विषय हाताळले होते. स्पर्धेत विधी महाविद्यालयाच्या ''पैठणी'' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दिग्दर्शन दीपक मांणगावकर, प्रकाश योजना साई शिर्सेकर व सर्वोत्कृष्ट अभिनय राधा टिकेकर यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळविली. मधुमिलिंद प्रतिष्ठानच्या प्रेम की यातना द्वितीय तर राजयोग कलामंच मुचरी च्या कुबडा तू बडा या एकांकिकेना तिसरा क्रमांक पटकावला. तसेच सुमती थिएटर्स रत्नागिरीच्या ''लज्जा द्यावी सोडून'' व मंगलमुर्ती फाऊंडेशन पालीच्या ''पॅडल'' या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आहे.
----
चौकट
पैठणी ही एकांकिका एका मुंबईतील मिल कामगारांच्या कुटुंबावर आधारित आहे. परब काकू तीचे पती व दोन मुले असा परिवार असतो. एकेदिवशी चाळीत पैठणीचा खेळ सुरु असतो. त्यात परब काकू पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी होतात. पण तिला विजय मिळत नाही. पण एकदा तरी आपल्याला पैठणी मिळावी, या आशेने त्या प्रयत्न करीत असतात. चाळीतील इतर महिला पेपरच्या कुपन जमा करुन पैठणी मिळविण्याचा प्रयत्न करतात. परब काकूही चोरुन पेपरची कात्रण काढून जमवतात. तिथेही तिला हार पत्करावी लागते. अखेर परब काकूच्या वाढदिवसाला घरातील मंडळी पैठणी घेऊन येतात. या एकांकिकेत येथील कीर विधी महाविद्यालयाचे कलाकार राधा टिकेकर, देवेंद्र मोहिते, धनंजय जाधव, कृतिका देसाई, अभिषेक धालवलकर, सोहम चव्हाण, विनात काळे, अविष्कार माने, नेहा नागवेकर, वनश्री गानू, नंदिनी चव्हाण, अथर्व बागकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.