वेर्लेतील आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी

वेर्लेतील आरोग्य शिबिरात
३०० रुग्णांची तपासणी
Published on

36870

वेर्लेतील आरोग्य शिबिरात
३०० रुग्णांची तपासणी

सावंतवाडी, ता. १२ : सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी-माजी सैनिक उत्कर्ष मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराला वेर्ले, शिरशिंगे, ओवाळीये, कलंबिस्त या गावातील सुमारे तीनशेहून जास्त रुग्णांनी लाभ घेतला.
अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी सैनिक श्री बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक भवन वेर्ले येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात मोफत औषधोपचार करण्यात आले. यासाठी केसरी फार्माचे संचालक व उद्योजक राजेंद्र उर्फ राजू केसरकर यांनी लागणारी सर्व औषधे प्रायोजित केली होती. फिजीशियन डॉ. अभिजीत चितारी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नेहा सावंत, मुत्ररोगतज्ज्ञ डॉ. सागर कोल्हे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखील अवधूत, एम.एस सर्जन डॉ. अनिकेत वजराटकर, दंतरोग तज्ज्ञ विनय सूर्यवंशी, होमिओपॅथिक डॉ. संजीव लिंगवत यांनी रुग्णांची तपासणी केली.
ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे, अशांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार देण्यात येणार आहेत. शिबिरात आयुष्मान भारत नोंदणीचीही व्यवस्था केल्याने अनेकांनी हा लाभ घेण्यासाठी नोंद केली. शिबिराचे उद्‍घाटन कलंबिस्त पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांनी केले. अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नवांगुळ यांनी आयुष्यष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती दिली. बालरोगतज्ज्ञ डॉ. संदिप सावंत यांनीही विचार मांडले. यावेळी माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. ‘एमबीबीएस’ची पदवी प्राप्त केलेले यश नवांगुळ यांचाही सत्कार झाला. माजी सैनिक हनुमंत राणे, महादेव लिंगवत, महादेव राणे, संतोष राऊळ, ‘अटल’च्या समन्वयक ज्योती राऊळ, नाना शेंडगे, मनिषा नवांगुळ, वेर्लेच्या पोलिसपाटील प्रियंका सावंत आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे खजिनदार अर्पिता वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com