

मोंड-वानिवडे जोडरस्ताप्रश्नी
गुरुवारी ग्रामसभेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः मोंड-वानिवडे (ता.देवगड) पुलाच्या जोडरस्त्याच्या अनुषंगाने मोंड ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक झाली. पुलाच्या कामासाठी गुरुवारी (ता.१६) ग्रामसभा बोलावण्याचे यावेळी ठरवण्यात आले.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोंड वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी संभाव्य जमीन जाणार्या संबंधित जमीन मालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. बासुतकर, किशन नवपुते यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती गणेश राणे, मोंड सरपंच शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट, ग्रामसेविका आचरेकर, सिंधुसेवा प्रबोधिनी अध्यक्ष रमेश सरवणकर, माजी उपसभापती संजय देवरुखकर, बाळा कोयंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. मोंड पूल पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यासाठी गुरुवारी (ता.१६) पुलाच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्याचे ठरले. ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.