माजी आमदार परशुराम उपरकर वाढदिवस विशेष

माजी आमदार परशुराम उपरकर वाढदिवस विशेष
Published on

पुरवणी डोके : माजी आमदार परशुराम उपरकर वाढदिवस विशेष

swt1316.jpg
37066
परशुराम उपरकर
swt1317.jpg
37067
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आशीर्वाद घेताना परशुराम उपरकर.
swt1318.jpg
37068
शिवसेना नेते जीजी उर्फ परशुराम उपरकर आपल्‍या सौभाग्‍यवती, मुलगा आणि मुलगी समवेत.
swt1319.jpg
37069
शिवसेना पक्षात पुन्हा प्रवेश केल्‍यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत परशुराम उपरकर, बाजूला वैभव नाईक, राजन तेली, गौरीशंकर खोत, सतीश सावंत.
swt1320.jpg
37070
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत जीजी उपरकर.
swt1321.jpg
37071
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्‍येक सभेवेळी उपस्थित असलेले त्‍यांचे शिलेदार परशुराम उपरकर.


जनतेशी बांधिलकी असणारा नेता

आजच्या राजकारणात सत्तेचे आकर्षण नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही जाणवते. नेत्यांची बांधिलकी जनतेशी किंवा विचारधारेशी असण्याऐवजी फक्त सत्तेशी राहिली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ताधारी पक्षात भाऊगर्दी दिसते. सर्व नेते सत्ताधारी पक्षात गेले तर जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना वाचा कुणी फोडणार? या प्रश्नाचे उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कधीच पडले नाही, कारण माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर नेहमी विरोधक म्हणून सक्रिय राहिले. त्यांनी प्रबळ विरोधकाची भूमिका बजावून सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणले. सत्तेशी नव्हे तर गोरगरीब जनतेशी बांधिलकी ठेवणारा हा जिल्ह्यातील शेवटचा नेता असावा, असे वाटते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्या. अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाने विरोधकांच्या एबी फॉर्मवरील उमेदवारांना पैसे दाखवून उमेदवारी मागे घ्यायला लावले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मतांची किंमत एक ते तीन हजार रुपये ठेवून जनतेलाही ‘विकत’ घेण्याचा प्रयत्न झाला. हा लोकशाहीच्या बाजारीकरणाचा काळ आहे. बाजारू नेते आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात बेडकासारखी उडी मारत स्वहित जपतात, तेव्हा जीजी सारखा नेता विरोधी पक्षात राहून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतो हे महत्त्वाचे आहे.
आज जनतेच्या प्रश्नांची कुणालाच पडलेली नाही. प्रत्येकजण आपली तुंबडी भरण्यात व्यस्त आहे. विरोधी पक्षात राहून दैनंदिन प्रश्नांवर बोलण्याची मानसिकताच राहिलेली नाही. सिंधुदुर्गचे पालकमंत्री मत्स्यव्यवसाय मंत्री असताना एलईडी मच्छीमारीविरोधात मालवणमध्ये माजी आमदार परशुराम उपरकर आणि वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांचा मोर्चा काढावा लागला. हे जिल्ह्याचे दुर्दैवच आहे. जीजी उपरकर या मोर्चात सहभागी होऊ शकले कारण ते आजही विरोधी पक्षात सक्रिय आहेत. म्हणूनच लोकशाहीत विरोधी पक्ष जिवंत राहणे ही काळाची गरज आहे.
राजकारणात शब्द दिला जातो आणि सोयीस्कररीत्या मोडलाही जातो. पाठीत खंजीर खुपसण्याची कला अवगत असावी लागते. राजकारणी कुणाचे नसतात, असे म्हटले जाते. मात्र उपरकर याला अपवाद आहेत. त्यांनी दिलेला शब्द कधीच मोडला नाही. विरोधकांच्या पाठीमागून वार करणे त्यांना कधीच जमले नाही. हिशेब समोरासमोर चुकते केले. त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे राजकीयदृष्ट्या मोठी किंमत चुकवावी लागली, तरी ‘स्ट्रेट फॉरवर्डनेस’ जपली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर नव्वदच्या दशकात तळकोकणात शिवसेना रुजवण्यासाठी अनेकांनी सर्वस्व झोकून दिले. सिंधुदुर्गात वरचढ समाजवादी आणि कॉंग्रेस नेत्यांना बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक पुरून उरला. परशुराम उपरकर यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, आंदोलने यशस्वी केली. प्रसंगी पोलिसांचा मार खाल्ला, डोके फुटले, रक्त सांडले, पण मागे हटले नाहीत. बाळासाहेबांनी दिलेला भगवा ध्वज कधी खाली पडू दिला नाही. रुद्राक्षाची माळ प्राणपणाने जपली. लवकरच जिल्ह्यातील शिवसैनिकांचा लाडका ''जीजी'' बनला. पक्षासाठी सर्वाधिक त्याग आणि रक्त सांडणारा नेता म्हणून कट्टर विरोधकही त्यांचा सन्मान करतात.
२००५ साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरचा काळ शिवसेनेसाठी अत्यंत कठीण होता. शिवसेनेचा भगवा ध्वज दिसला तरी दगडफेक व्हायची. पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होते. अशा भयावह परिस्थितीत परशुराम उपरकर पुढे आले. त्यांनी भगवा ध्वज खांद्यावर घेतला. राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलो असते तर सत्तेची फळे चाखता आली असती, पण त्यांची बांधिलकी भगव्याशी, शिवसैनिकांशी आणि ठाकरे कुटुंबाशी होती. त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्या दहशतीच्या काळात राहत्या घरी किंवा रस्त्यावर हल्ल्याची भीती होती, तरी इमान जपले. जिल्हाभरातील शिवसैनिकांना धीर आणि नेतृत्व दिले. पडत्या काळात संघटना टिकवली.
२००५ च्या पोटनिवडणुकीत रस्त्यावर उतरून संघर्ष केला नसता तर तळकोकणात शिवसेना पुन्हा उभी राहिली नसती. या लढवय्येपणाबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानपरिषद आमदारकी दिली.
विधानपरिषद आमदार झाल्यानंतर जनतेशी बांधिलकी जपण्याची वेळ आली. नारायण राणे यांनी कळणे गावात प्रदूषणकारी मायनिंग प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जीजी उपरकर यांनी शिवसेनेकडून या आंदोलनात उडी घेतली. असंतोषाची ठिणगी वणव्यामध्ये रूपांतरित झाली. हे आंदोलन जिल्हाभर पसरले. सत्ताधारी पक्ष आपल्याच जनतेवर अन्याय करतो हे जनतेने पाहिले. जनमत कलुषित झाले. शिवसेनेला दीर्घकालीन राजकीय फायदा झाला, त्यात जीजींचा सिंहाचा वाटा होता.
वेंगुर्ला नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी लाथा मारल्या. संतप्त नागरिकांनी राणेंना कोंडले. विरोधक नेते कातडी बचाव करत दूर राहिले. जीजी उपरकर आपल्या शिवसैनिकांसह पोहोचले आणि आंदोलनात सहभागी झाले. तुफान राडा झाला. जीजींवर जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांच्या फायरिंगमुळे ते वाचले. हल्ल्यात दोघांना साडेसात वर्षे कारावास झाला. या घटनेनंतर सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवणमध्ये सत्ताधारी पक्षाची सत्ता गेली. जनतेने राजकीय दहशतीला मतपेटीत उत्तर दिले. जीजी यांनी हा मुद्दा बिंबवला. नंतरच्या निवडणुकीत राजकीय दहशतवाद प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आणि शिवसेनेला यश मिळाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विधानपरिषद तिकीट कापल्याने नाराज होऊन २०१२ साली जीजी उपरकर यांनी शिवसेना सोडली. पक्षांतर्गत कोंडीला कंटाळून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेत १२ वर्षे काम केले, तरी ठाकरे कुटुंबावर टीका केली नाही. सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना मनसेतील जीजींचाच जास्त आधार वाटायचा.
२०२२ मध्ये शिवसेना फुटल्यानंतर जीजींच्यातला शिवसैनिक स्वस्थ बसू शकला नाही. भगवा झेंडा खुणावत होता. राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सभा घेतल्यावर जीजींनी शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) परतण्याचा निर्णय घेतला. दापोलीत आदित्य ठाकरे यांनी कौटुंबिक संबंध आठवून पुढाकार घेतला. ऑक्टोबर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी झाली. उद्धव ठाकरे यांनी उकडे तांदूळ मागून ऋणानुबंध जपले.
आज सत्ता गेली असताना कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात जात आहेत. संघटनेच्या भवितव्याचा प्रश्न आहे. अशा प्रतिकूल काळात पदाची अपेक्षा न ठेवता कडवट शिवसैनिक परशुराम उपरकर पुन्हा संघर्षासाठी मुळ पक्षात परतले आहेत. ''शिवसेनेची सत्ता रस्त्यावर असते'' हे बाळासाहेबांचे संस्कार त्यांच्या मनावर कोरले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारा, सत्तेच्या मोहाला बळी न पडणारा, भगव्याशी इमान जपणारा आणि ठाकरे कुटुंबाशी निष्ठा ठेवणारा नेता म्हणून परशूराम उर्फ जीजी उपरकर यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या सडेतोड स्वभावाने, रस्त्यावरील संघर्षाने आणि पक्षप्रेमाने जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाली. आजही ते विरोधी पक्षात राहून जनतेच्या प्रश्नांवर बोलतात. वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा! भविष्यात संघर्षातून शिवसेनेला सिंधुदुर्गात पुन्हा झळाळी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
---------------
लेखन : अनुपम कांबळी
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com