सावंतवाडी रुग्णालयातील समस्या सोडवू

सावंतवाडी रुग्णालयातील समस्या सोडवू
Published on

37062

सावंतवाडी रुग्णालयातील समस्या सोडवू

नगराध्यक्षा भोसले : पालिकेत उद्या बैठक घेणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : ‘‘येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना योग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेत लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील,’’ अशी ग्वाही नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी आज दिली.
सहकारी नगरसेवकांसह त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांची पाहणी केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाणी, वीज व अस्वच्छता अशा समस्यांसंदर्भात नगराध्यक्ष सावंत-भोसले यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने आज त्यांनी सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देत पाहणी केली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, रुग्णकल्याण समितीचे सदस्य रवी जाधव, उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य राजू केळुसकर, संजय लाड, एन. बी. रेडकर, जितेंद्र मोरजकर, संपत दळवी आदी उपस्थित होते.
--------
‘मल्टिस्पेशालिटी’ विषय पालकमंत्र्यांकडे!
नगराध्यक्षा सावंत-भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयाची शवविच्छेदन इमारत, शीतगृहे, तसेच पाण्याची समस्या, परिसरातील साफसफाई अन्य गोष्टींची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक ऐवळे यांनी विविध गोष्टींकडे लक्ष वेधले. चर्चेदरम्यान येत्या बुधवारपर्यंत नगरपालिकेमध्ये या संदर्भात बैठक बोलावून आवश्यक तोडगा काढून रुग्णालयातील समस्या दूर केल्या जातील. अन्य काही समस्या असतील तर त्याही सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. ‘मल्टिस्पेशालिटी’संदर्भात पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे विषय असून त्यांच्याशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com