

37065
खारेपाटण येथे आरोग्य, रक्तदान शिबिर
शिवसेना विभागाचा उपक्रम : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय येथे आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिंदे शिवसेना पक्ष खारेपाटण विभाग व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते. हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
कार्यक्रमाला शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल प्राचार्य संजय सानप, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, खारेपाटण ग्रा.पं सदस्य मनाली होणाळे, दक्षता सुतार, सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, संस्थेचे संचालक प्रशांत गुळेकर, तेजस राऊत, सुहास राऊत, माजी ग्रा.पं. सदस्य योगेश पाटणकर, रोटरी सदस्य अजय गुरसाळे, संतोष राऊत, पप्पू रायबागकर, सिंधू मित्र रक्त प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दादा जाधव आदी उपस्थित होते. या आरोग्य शिबिराला अथायू हॉस्पिटल कोल्हापूर येथील डॉक्टर व कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराकरिता सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी खासदार नारायण राणे यांच्या यशस्वी संघर्षमय राजकीय कारकिर्दीचा ऊहापोह केला. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आशा राजाराम कावळे पॅरा मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. दर्शना पाताडे यांनी सूत्रसंचालन तर मंगेश गुरव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.