

37101
कांजूरमार्गच्या शाळेला शिक्षक संघटनेचे ‘बळ’
नूतनीकरणाला प्रारंभ; डॉ. कडणे यांच्याकडून २५ लाखांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : मुंबईतील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी आता शिक्षक संघटनांनी प्रत्यक्ष कृतीतून पाऊल उचलले आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त आणि शिक्षक नेते सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांनी कांजूरमार्ग येथील डॉ. दत्ता सामंत माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी २५ लाखांचा स्वनिधी उपलब्ध करून दिला. एका शिक्षक संघटनेने शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी अशा प्रकारे निधी देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना मानली जात आहे.
या नूतनीकरण कार्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच डॉ. दत्ता सामंत माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, डॉ. विशाल कडणे आदी उपस्थित होते. मुंबईत मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. मात्र, केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता डॉ. कडणे यांनी सामाजिक बांधिलकीतून शाळेचे रुपडे पालटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पुढाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात एका नव्या आदर्शाची पायाभरणी झाली आहे.
-----------
महापालिका सहकार्य करणार
राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षकांच्या या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधने आणि शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
-----------------
कोट
मराठी शाळांच्या सशक्तीकरणासाठी केवळ घोषणा करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष मदतीचा हात देणे आवश्यक आहे. भविष्यात कोणतीही मराठी शाळा बंद पडू नये, यासाठी शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे.
- डॉ. विशाल कडणे, विश्वस्त, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.