

३७१०७
सावंतवाडीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव
नगरपरिषदेचा उपक्रम ः स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या कायमस्वरुपी, तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी सर्व कामगारांना आरोग्यविषयक साहित्य संच भेट देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
हा विशेष उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. समाजाच्या आरोग्याची जपवणूक करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थितांनी सांगितले की, स्वच्छता कामगारांचे समाजातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या सन्मानामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या परिश्रमाला मिळालेल्या या पोचपावतीमुळे त्यांना कामासाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजप नेते विशाल परब, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक राजू बेग, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, राजे प्रतिष्ठानचे शिवा गावडे, मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.