दैव, घोसास, कीर महाविद्यालयात महात्मा फुले जयंती

दैव, घोसास, कीर महाविद्यालयात महात्मा फुले जयंती
Published on

‘देव,घैसास,कीर’मध्ये
महात्मा फुले जयंती
रत्नागिरी ः भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग व आयक्युएसी विभागातर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. इतिहास विभागप्रमुख प्रा. रिया बंडबे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, आयक्यूएसी समन्वयक प्रा. साळगावकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. तेजस जाधव याने आभार मानले.

अक्षरगंगा परीक्षेत
शीळ शाळेचे यश
रत्नागिरी : अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शीळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने यश मिळवले. यात तिसरीतील युग वाडकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिसरीतील देवांग पवार, अमोल मिस्त्री, सनगरे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ही परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आली. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश वाडकर, सर्व सदस्य शीळ, विजय देसाई, संदीप नाचणकर, शुभम कदम, विनायक कदम, प्रसन्न करंदीकर यांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले. केंद्रप्रमुख मेघा कांबळे मुख्याध्यापक मकसूद सय्यद, शिक्षिका स्मितांजली जाधव, वृषाली नाचणकर, अर्चना वारकरी, देसाई, पालक, ग्रामस्थ माजी विद्यार्थीसंघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

स्वामी समर्थ
पुण्यतिथी उत्सव
चिपळूण : शहरातील ओझरवाडी उपनगरातील डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ (गुहा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (ता. १५ ) हा उत्सव आयोजित करण्यात आला असून, त्या निमित्ताने सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. सायंकाळी श्री पिटलेवाडी मंडळ यांच्यावतीने हरिपाठ सादर केला जाणार आहे. तसेच रात्री श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ यांच्याकडून संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्व स्वामीभक्तांनी उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ ग्रामस्थ व महिला मंडळ, ओझरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com