मुंबई-गोवा महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य;

मुंबई-गोवा महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य;
Published on

37050

महामार्गालगत कचऱ्याचे ढीग
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : ​मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवाशांचा प्रवास सुसह्य झाला असला, तरी या महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. विशेषतः भरणे ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या लगत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. महामार्गाचे नूतनीकरण झाले असले तरी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही.
महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल व्यावसायिक तसेच काही बेजबाबदार प्रवाशांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. भरणे ग्रामपंचायत परिसरातील महामार्गनजीकच्या मोकळ्या जागांवर प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे उरलेले अंश आणि इतर टाकाऊ वस्तूंचा कचरा सर्रास टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष ः
महामार्ग सुशोभित करण्यासाठी आणि प्रवाशांना स्वच्छ वातावरण देण्यासाठी प्रशासनाने अनेकदा दावे केले होते; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कचऱ्याच्या या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com