दुचाकीस्वाराला डुलकी, मोटारीला धडक

दुचाकीस्वाराला डुलकी, मोटारीला धडक
Published on

37154

दुचाकीस्वाराला डुलकी; मोटारीला धडक

युवक गंभीर जखमी; कारीवडे-गोठण देवस्थानजवळील प्रकार


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : कारीवडे येथील गोठण देवस्थानजवळ झालेल्या भीषण अपघातात संतोष गुळदवेकर (वय २३, रा. माडखोल) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. एका दशावतार नाटक कंपनीत झांज वादक म्हणून कार्यरत असलेला संतोष हा नाटकाचा प्रयोग संपवून घरी परतत असताना हा अपघात काल रात्री बाराच्या सुमारास झाला.
संतोष गुळदवेकर हा तरुण एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजवण्याचे काम करतो. काल रात्री नाटकाचा कार्यक्रम संपवून तो आपल्या दुचाकीने माडखोल येथील राहत्या घरी जात होता. रात्री बाराच्या सुमारास कारीवडे-गोठण देवस्थान परिसरात आला असता, त्याला अचानक झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत संतोषच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे रवी जाधव यांना देण्यात आली. माहिती मिळताच जाधव यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीच्या प्राथमिक उपचारांची व्यवस्था केली. त्यानंतर संतोषच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना अपघाताची माहिती दिली. संतोषची प्रकृती पाहता, पुढील अधिक उपचारांसाठी त्याला तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) हलविले. आज सकाळी रवी जाधव यांनी संतोषच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे समजते. ऐन मध्यरात्री देवदूत बनून धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर, रवी जाधव आणि रुग्णालय कर्मचारी नीलेश राऊळ यांच्या सतर्कतेमुळे जखमी युवकाला वेळेत उपचार मिळू शकले. त्यांच्या या मदतकार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
--------
​सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी नीलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी संतोषला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातून ​सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com