रत्नागिरी ः उत्तम माणूस म्हणून स्वतःला विकसित करा

रत्नागिरी ः उत्तम माणूस म्हणून स्वतःला विकसित करा
Published on

rat14p1.jpg-
37217
रत्नागिरी ः सिंधुरत्न सर्च परिक्षेतील गुणवंताना गौरविताना सोबत प्रतिष्ठानचे पदाधिकारी व विद्यार्थी.

उत्तम माणूस म्हणून स्वतःला विकसित करा
सुहास वाडेकर ; सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे पारितोषिक वितरण
रत्नागिरी, ता. १४: "सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा ही केवळ एक परीक्षा नसून ती एक जीवनशैली आहे. आज शिकणे सोपे झाले असले तरी स्पर्धा कमालीची वाढली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्यापूर्वी स्वतःला एक उत्तम माणूस म्हणून विकसित करावे," असा मोलाचा सल्ला आदर्श शाळा नाखरे नं. १ चे पदवीधर शिक्षक सुहास वाडेकर यांनी दिला.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित ''सिंधुरत्न टॅलेंट सर्च'' परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. ''स्पर्धा परीक्षेतून माणूस घडविणारे शिक्षण'' या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये इस्रो सफरीसाठी निवड झालेले १५ विद्यार्थी, गोवा सायन्स सेंटरला भेट देणारे १० विद्यार्थी, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत चमकलेले ५ पहिले विद्यार्थी यांचा समावेश होता. यावेळी १७५ विद्यार्थी आणि सुमारे ४५० पालक-शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. वाडेकर म्हणाले, "यशापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. केवळ नोकरी मिळवण्यासाठी न शिकता समाज घडवण्यासाठी शिका. ज्या मुलाला मातृप्रेम कळते, त्यालाच राष्ट्रप्रेम उमजते. तुमच्याकडे किती क्षमता आहे, यापेक्षा तुमची वृत्ती काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे." पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी ''मुलांसाठी वाटेल ते करण्यापेक्षा योग्य तेच करा'' असा सजगतेचा मंत्र दिला.
या कार्यक्रमावेळी युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत, स्पर्धा प्रमुख सुशांत मर्गज, जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी, प्रशांत बोभाटे, प्रशांत दळवी, तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दीपक नागवेकर, सुरेंद्र रणसे, दीपक माळी, प्रकाश काजवे उपस्थित होते. मान्यवरांनी सुहास वाडेकर यांच्या शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्याचे विशेष कौतुक केले. विशाल मोरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश केसरकर, संतोष देवळेकर, सुजित वाफेलकर, आशिष सावंत, रवींद्र पराडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com