डॉ. आंबेडकरांचे विचार विज्ञाननिष्ठ

डॉ. आंबेडकरांचे विचार विज्ञाननिष्ठ
Published on

37319

डॉ. आंबेडकरांचे विचार विज्ञाननिष्ठ

ठाकूर-देसाई : गोपुरी आश्रमात ‘विज्ञाननिष्ठ भारत’वर चर्चासत्र

कणकवली, ता. १४ : स्वातंत्र्यपूर्व काळात देशात मोठ्या प्रमाणात जातीयता व सामाजिक विषमता होती. या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर लढा दिला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला समर्पित केले आणि समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. डॉ. आंबेडकर हे विज्ञाननिष्ठ विचारांचे होते. मात्र, अलीकडच्या काळात समाजात द्वेषाची भावना वाढीस लागली आहे, असे मत राष्ट्र सेवा दलाचे सुहास ठाकूर-देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसेवा दल व गोपुरी आश्रमा यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी येथे ‘विज्ञाननिष्ठ भारत आणि आंबेडकर’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ साथी कमलताई परुळेकर होत्या. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण नाईक आदी उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधान दिले असून, देशाची वाटचाल संविधानावर आधारित आहे. मात्र, सध्या धर्मांध शक्ती संविधानाचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचा धोका आहे. त्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे. देशात नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये द्वेष पसरवला जात असून, तो वाढल्यास देशाची एकसंधता धोक्यात येऊ शकते. संविधानविरोधी शक्तींना रोखण्यासाठी संविधानप्रेमींनी कृतीशील कार्यक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक आहे.’
राजेंद्र मुंबरकर यांनी सांगितले की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे देशाला संविधान मिळाले असून, ते प्रत्येक नागरिकाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. संविधानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. तसेच, तरुण पिढीने डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेऊन त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या चर्चासत्राला व्ही. के. सावंत, संदीप सावंत, नितीन वाळके, विनायक (बाळू) मेस्त्री, अर्पिता मुंबरकर, पत्रकार तुषार हजारे, सहदेव पाटकर, सदाशिव राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com