

ratchl141.jpg-
37357
चिपळूण ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.
--------------
महामानवाचे विचार
आत्मसात करा
सुगंधा माळी ; खेर्डीत जयंतीनिमित्त कार्यक्रम
चिपळूण, ता. १४: ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणासाठी संघर्ष केला. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाज घडवण्यासाठी पुढे यायला हवे,’’ असे प्रतिपादन खेर्डी ग्रामपंचायतीच्या प्रशासक सुगंधा माळी यांनी केले.
खेर्डी ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सौ. माळी म्हणाल्या, हा दिवस केवळ जयंती नसून सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणाच्या क्रांतीचा दिवस आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेबांनी देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठे परिवर्तन घडवले. त्यांनी दिलेला ''शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'' हा मंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. जीवनात प्रगती करायची असेल, तर शिक्षणाला कोणताही पर्याय नाही. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजित खाताते, विजय शिर्के, राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर यांनीही महामानवाच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
----------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सती विद्यालयात गुणवंतांचा गौरव
चिपळूण, ता. १४ : खेर्डी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या इयत्ता सहावी व सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व विभाग प्रमुख आनंद भुवड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली, ज्याचे वाचन कला शिक्षक तुकाराम पाटील यांनी केले. मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. समिधा पाटणे यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित कविता सादर केली. अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात वक्तृत्व स्पर्धेत इच्छा सिताराम कदम, भूमी विजय कोलगे, वेदांत महेंद्र महाडिक यांनी यश मिळवले. चित्रकला स्पर्धेत अन्वी प्रवीण दाभाडे, ईशिता श्रीराम चव्हाण, साक्षात सचिन कदम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.
-------
rat14p22.jpg
O37284
खेड ः डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेली मिरवणूक.
-rat14p23.jpg-
37285
खेड ः मिरवणुकीत साकारण्यात आलेला देखावा.
-----------
खेडमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात
खेड, ता. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव खेडमध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे आयोजित या सोहळ्यात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने आल्याने शहरात जणू जनसागर लोटला होता.
जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात भव्य कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान या मार्गावर काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये स्थानिक तालुकाध्यक्ष मंदार गंगाराम हळदे व मुंबईचे ॲड. दीपक केरू हळदे यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. १४ एप्रिल रोजी सकाळी धम्मध्वजारोहण आणि पूजापाठाने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर निघालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, वाणी पेठ, गांधी चौक आणि तीनबत्ती नाका मार्गे जिजामाता उद्यान येथे पोहोचली. या मिरवणुकीत संविधानावर आधारित विद्यार्थ्यांनी सादर केलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
मिरवणुकीनंतर दुपारच्या सत्रात जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. सतीश पां. जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित करत समाजाला प्रगत होण्याचे आवाहन केले.
-----------------
वेलदूर नवानगर शाळेत जयंती साजरी
गुहागर, ता. १४ : विविध देशांतील राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. या संविधानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे हक्क मिळाले असून, देशात संविधानापेक्षा मोठे काहीच नाही, असे प्रतिपादन अफसाना मुल्ला यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील वेलदूर शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी.
----------------
rat14p27.jpg-
37349
लांजा ः आमदार किरण सामंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना.
-------------
बाबासाहेबांचा समानतेचा संदेश
सर्वांसाठी मार्गदर्शक ः किरण सामंत
लांजा, ता. १४ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि समानतेचा संदेश हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांवर चालत शिक्षण, एकता आणि प्रगती साधावी, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले.
लांजा शहरात जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार सामंत यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवकांनी भाषणे, गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत अभिवादन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनीही मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. या निमित्ताने लांजा परिसरात सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.