

rat14p31.jpg
37353
आंबडवे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांत बोलताना मंत्री उदय सामंत.
rat14p30.jpg
37352
आंबडवे : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना मंत्री उदय सामंत, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अन्य मान्यवर अनुयायी.
------------
आंबडवेतील स्मारकासाठी शासन कटिबद्ध
उदय सामंतः पाच संविधान भवनांचे पुढील वर्षी लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार अमलात आणल्यास देशाला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत ‘संविधान भवन’ उभारले जात असून, त्यांचे लोकार्पण पुढील वर्षी करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे मूळ गाव आंबडवे (ता. मंडणगड) येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. आंबडवे येथील स्मारकाबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. स्मारक होत असताना असताना स्थानिक ग्रामस्थांवर कोणताही आर्थिक अन्याय होणार नाही, याची जबाबदारी आपण घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी येथील घरांच्या अडचणी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यास आपण कटिबद्ध आहे. जमीन अधिग्रहण आणि ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, पुढील वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
यावर्षीच्या जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून पोलिस बँड पथकाद्वारे स्मारकासमोर डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. सोहळ्याला विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जि. प. सभापती मयुरी शिर्के, सुयोग कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी परीक्षित यादव, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात आदी उपस्थित होते.
चौकट
रत्नागिरीत बौद्ध विहार निर्माण
लंडनमध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेबांचे स्मारक आहे, तसेच भव्य स्मारक व तरुण पिढीसाठी रत्नागिरीत बौद्ध विहार निर्माण होत आहे. त्यासाठी १० कोटींचा निधी दिला आहे. संघर्ष हा नेहमी विधायक आणि देशप्रेमासाठी असावा, हा बाबासाहेबांचा विचार युवा पिढीने जपायला हवा, असा सल्लाही पालकमंत्री सामंत यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.