

शिरोडा-वेंगुर्लेमार्गे
बोरिवली बसफेरी
वेंगुर्ले ः शिरोडा-वेंगुर्ले-बोरिवली बसफेरी १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येत असून शिरोडा येथून सायंकाळी ४.३० वाजता आणि वेंगुर्ले येथून सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येईल. हीं बस बोरिवलीवरून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. गेल्या कित्येक दिवसांची मागणी असलेली ही फेरी सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सदर मागणीची तात्काळ दखल घेत ही बसफेरी सुरू करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्यानंतर १५ एप्रिलपासून ही बस सुरू होत आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा वेंगुर्ले आगार अध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजप तालुकाध्यक्ष तथा आगार कार्याध्यक्ष पप्पू परब, वेंगुर्ले जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव भरत चव्हाण यांच्या पाठपुराव्याने ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे.
----
सातार्डा येथे
क्रिकेट स्पर्धा
सातार्डा : सातार्डा -भटवाडी येथील देव काळोबा स्पोर्टस क्लबतर्फे एक गाव एक संघ खुल्या, ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १८ व १९ ला केले आहे. भटवाडी येथील मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला १५,००० रु. व चषक व उपविजेत्या संघाला १०,००० रु. व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजसाठी प्रारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम सहभाग घेणाऱ्या १६ संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी मंडळाचे कार्यकर्ते गौरव केळुस्कर, शुभम देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------
वेंगुर्ले येथे
गुटखा जप्त
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या पुढील भागातून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वेंगुर्ले कॅम्प म्हाडा कॉलनी येथील वनिता अजित गावडे (वय ४५) यांच्याकडे सुमारे १३,७५० रुपयांचा गुटखा व तंबाखू मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी वनिता अजित गावडे यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.
--------
पावणादेवी मंदिराचा
१८ ला वर्धापन दिन
सातार्डा ः धाकोरे येथील पावणादेवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १८ ला होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी लघुरुद्र, पूजा, होमहवन, महाआरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन, रात्री ९.३० वाजता चव्हाटा रंगमंच येथे मोरे येथील मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन - श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट, समस्त मुळीक परिवार व धाकोरे ग्रामस्थांनी केले आहे.
---------------
हिंदू समाजाचे
१८ ला संमेलन
परुळे ः सनातन हिंदु धर्म, भारतीय संस्कृती व समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने १८ ला दुपारी ३.३० वाजता पाट येथील आदिशक्ती मंगल कार्यालयात पाट, परुळे, म्हापण दशक्रोशीतील हिंदू समाजाचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हिंदू बांधवांनी या संमेलनाला उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.