कुडाळात महिलांसाठी २३ ला प्रशिक्षण

कुडाळात महिलांसाठी २३ ला प्रशिक्षण
Published on

कुडाळात महिलांसाठी २३ ला प्रशिक्षण
कुडाळ ः भगिनी मंडळ कुडाळ आयोजित थंड पेये बनविण्याचे मार्गदर्शन करणारा प्रशिक्षण वर्ग येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. २३) दुपारी ३ ते ६ या वेळेत येथील मराठा समाज हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित केला आहे. या प्रशिक्षण वर्गामध्ये ताज्या फळांचा रस किंवा पल्प वापरून विविध प्रकारची सरबते, आरोग्याला उपयुक्त असे सॅलड्स किंवा नॉन-अल्कोहोलिक मॉकटेल्स बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व्यावसायिक दृष्टिकोनातून दिले जाणार आहे. छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा वर्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी २१ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० महिलांनाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर व भगिनी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
......................
आजगावात प्रेरणा कट्ट्याचा कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक ६६ वा कार्यक्रम शनिवारी (ता. १८) सायंकाळी ५ वाजता आरवली येथील हॉटेल माहेर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कथाकथन या विषयाला वाहिलेल्या या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे दहा सदस्य विविध कथा सादर करणार आहेत. यातील काही कथा स्वरचित असतील, तर काही प्रथितयश लेखकांच्या असतील. कथनशैलीला महत्त्व असलेल्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
---
कोळोशीत मेमध्ये रस्सीखेच स्पर्धा
नांदगाव ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठान कोळोशी यांच्या वतीने १ मे रोजी कणकवली, वैभववाडी व देवगड तालुक्यांतील महिला व पुरुष गट संघांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष गटासाठी अनुक्रमे ५१११ व चषक, ३१११ व चषक व २१११ रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. महिला गटासाठी अनुक्रमे २१११ व चषक, ११११ व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी संपर्क साधावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com