रत्नागिरी-''ऑपरेशन क्लीन सी'' अंतर्गत पुन्हा धडक मोहीम सुरू

रत्नागिरी-''ऑपरेशन क्लीन सी'' अंतर्गत पुन्हा धडक मोहीम सुरू
Published on

37595

‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत पुन्हा मोहीम
गस्ती नौकाची दुरूस्ती पूर्ण; एलईडीविरोधात होणार कारवाई

चौकट
* समुद्रकिनारा - १६७ किमी
* एकूण मासेमारी नौका -२९६०
* यांत्रिकी नौका - २५६०

रत्नागिरी, ता. १५ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून थंडावलेली अवैध मासेमारीविरूद्धची मत्स्यविभागाची कारवाई आजपासून पुन्हा तीव्र केली जाणार आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेची देखभाल-दुरूस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे बेकायदा एलईडी व मासेमारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा इशारा मत्स्यविभागाने दिला आहे.
जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टीवर ''ऑपरेशन क्लीन सी'' अंतर्गत धडक मोहीम राबवली जात आहे. ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत ९ एप्रिलपर्यंत चार एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली होती; मात्र, त्यानंतर गस्ती नौकेच्या देखभाल व दुरूस्तीच्या कामामुळे ही कारवाई पाच दिवसांसाठी थांबवण्यात आली होती. आता नौका पुन्हा सज्ज झाल्याने समुद्रामध्ये गस्त वाढवण्यात येणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मत्स्यविभागाची नजर असली तरी गस्ती नौका आणि कमी मनुष्यबळाचा मत्स्यविभागापुढे अडथळा येत आहे. कोणतीही परवानगी न घेता ही मासेमारी होत असल्याच आरोप पारंपरिक मच्छीमार करत आहेत. गस्ती नौकेच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, आजपासून समुद्रामध्ये पुन्हा गस्त सुरू होणार आहे.
----------------
चौकट...
का वाढली अवैध मासेमारी?
यंदाचा मासेमारीचा हंगाम तोट्यात गेल्याने झालेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी अनेक नौकामालकांनी छुप्या पद्धतीने एलईडी प्रकाशाचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांनी या एलईडी मासेमारीविरूद्ध जोरदार मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने रत्नागिरीतही कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यात चार एलईडी नौका पकडल्या होत्या.
-----------------
चौकट
...अनेकांचा धाबे दणाणले
प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी आणि सागरी जैवविविधता टिकवण्यासाठी ''ऑपरेशन क्लीन सी'' निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com