

rat15p14.jpg -
37477
विद्याधर गोगटे
----------
मावळंगेत प्रभाग पोटनिवडणुकीत गोगटे बिनविरोध
पावस, ता. १५ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. १ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेगटाचे विद्याधर गोगटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याच्या कारणावरून त्यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता; मात्र पुन्हा त्यांचीच निवड झाली.
२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मावळंगे ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या नम्रता बिर्जे थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या. त्या वेळी ९ सदस्यांपैकी ५ ठाकरे गटाचे तर ४ सदस्य शिंदेगट-भाजप युतीचे होते. ठाकरे गटाचे विद्याधर गोगटे त्या वेळी उपसरपंचपदी विराजमान झाले; मात्र, सत्ता असूनही गावविकासासाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याने आणि ग्रामस्थांच्या अडचणी सुटत नसल्याने त्यांनी दीड वर्षापूर्वी सदस्य आणि उपसरपंच अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर गोगटे आणि त्यांच्या समर्थकांनी विकासकामांच्या ओढीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेगटात प्रवेश केला. नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेगटाने पुन्हा गोगटे यांनाच उमेदवारी दिली. या जागेसाठी ठाकरे गटाकडून कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. या प्रभागातून ठाकरे गटातून शिंदेगटात आलेले नीलेश गजने हे देखील इच्छुक होते; मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेत गोगटे यांना पाठिंबा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.