

rat१५p२६.jpg-
26O37505
अन्वी घाडये
rat१५p२७.jpg -
26O37506
गौरी पळसमकर
--
‘सिंधुरत्न टॅलेंट’मध्ये
विद्यार्थ्यांचे यश
राजापूर ः सिंधुदूर्ग जिल्ह्याातील युवा संदेश प्रतिष्ठान नाटाळ-सांगवे संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये तालुक्यातील वडदहसोळ नं. २ प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यामध्ये गौरी पळसमकर हिने जिल्ह्यामध्ये तिसरा तर अन्वी घाडये हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका बागाव, देसाई, गणेश पवार, दीपक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
राजापूर पंचायतची
आज आढावा बैठक
राजापूर ः राजापूर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वा. सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहामध्ये होणाऱ्या या सभेमध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
पोपटराव पवारांचे
राज्यापुरात व्याख्यान
राजापूर ः ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेले हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे ‘यशोगाथा ग्रामविकासाची’ या विषयावरील व्याख्यान तालुक्यातील रायपाटण येथे शनिवारी (ता. १८) सकाळी ९.३० वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रायपाटण गावच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा ठरवणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मानसोहळाही आयोजित करण्यात आला आहे. या वेळी खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत.
डॉ.आंबेडकर जयंती
भाजपतर्फे साजरी
राजापूर ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती तालुका भाजपतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, अॅड. एकनाथ मोंडे, जिल्हा उपाध्यक्ष शीतल पटेल, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे आदी उपस्थित होते.
शीळ येथे साकव
कामाचे भूमीपूजन
राजापूर ः शीळ येथील शीळ शाळा नं. १ गोंडाळवाडी, भरडवाडी वहाळावर बौद्धवाडी मधलीवाडी जोडणाऱ्या साकव कामाचे भूमीपूजन ग्रामस्थ भिकाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना साकव विकास कार्यक्रमांतर्गत हा साकव मंजूर झाला आहे. या वेळी प्रशासक अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, नामदेव नागरेकर, गोपाळ गोंडाळ, शांताराम गोंडाळ, मधुकर सावंत, रघुनाथ भोवड आदी उपस्थित होते. या कामासाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या साकवामुळे ग्रामस्थांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.