रत्नागिरी- ''संगीत समिधा''चा रत्नागिरीत १८ ला

रत्नागिरी- ''संगीत समिधा''चा रत्नागिरीत १८ ला
Published on

''संगीत समिधा''चा
शनिवारी प्रयोग
रत्नागिरी, ता. १५ : महाराष्ट्र शासनाच्या ६४व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेत कलारंग नाट्यप्रतिष्ठान (वरवडे- खंडाळा) संस्थेने सादर केलेले रजपुतांच्या ज्वलंत इतिहासाची धगधगती कथा असलेले संगीत समिधा नाटक रत्नागिरीत सादर होणार आहे. येत्या शनिवारी (ता. १८) सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरूण जोशी, दिग्दर्शक नितीन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमेय धोपटकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक रजपुतांच्या इतिहासावर आधारित आहे. एकूण १३ कलाकार यात असून, ३ कलाकारांनी प्रथमच रंगमंचावर पदार्पण केले आहे. या वेळी नाटकातील सेनापती गोरा ही प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार विनायक उर्फ राजू जोशी, संगीत दिग्दर्शक विजय रानडे आणि ऋग्वेद रानडे उपस्थित होते. रजपुतांचा हा इतिहास संगीत नाटकातून समोर आणण्याचे काम संस्थेने केले आहे. हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी अवश्य यावे, असे आवाहन अध्यक्ष अरूण जोशी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com