तिलारीतील बेकायदा बंधाऱ्यामुळे हानी

तिलारीतील बेकायदा बंधाऱ्यामुळे हानी
Published on

swt१५२५.jpg मध्ये फोटो आहे.
सुधीर दळवी

तिलारीतील बेकायदा बंधाऱ्यामुळे हानी

सुधीर दळवींची तक्रार; जलसंपदा, पालकमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १५ : तिलारी नदीपात्रात कोणतीही शासकीय परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
श्री. दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीने जलसंपदा, महसूल आणि पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता हा बंधारा उभारला आहे. यामुळे नदीतील पाणी अडविले गेले असून, खालील भागातील शेतकरी आणि बागायतदारांना त्याचा मोठा फटका बसत आहे. पाण्याचा प्रवाह बदलल्याने शेती पिकांचे नुकसान होत असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणात दोडामार्ग तहसीलदारांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही जबाबदारी जलसंपदा विभागावर ढकलली. दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी यावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशासनातील दोन्ही महत्त्वाच्या विभागांची ही टोलवाटोलवी आणि मौनाची भूमिका आहे. बंधाऱ्यामुळे नदीतील पाणी अडविले गेल्याने नैसर्गिक प्रवाह विस्कळीत झाला आहे. खालील भागातील शेती आणि बागायती पाण्याअभावी कोमेजत आहेत, तर काही ठिकाणी प्रवाह बदलल्याने पाण्याचा अनियंत्रित मारा होत शेतीचे नुकसान होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, नदीच्या पर्यावरणीय संतुलनालाही मोठा धोका निर्माण झाला आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
-------
हरित लवाद, उच्च न्यायालयात दाद मागू!
याप्रकरणाची सखोल चौकशी करून तिलारी नदीतील बंधारा तत्काळ हटवावा. तो उभारणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दळवी यांनी केली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास हरित लवाद आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दळवी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com