

माजी विद्यार्थी मेळावा मंगळवारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : पटवर्धन हायस्कूलच्यावतीने गुरूवर्य कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पटवर्धन हायस्कूल येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात गुरूवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. माजी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम होईल. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वर्गखोल्यांच्या देणगीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, उपाध्यक्ष विनायक हातखंबकर, कार्यवाह संजय शिवलकर, सहकार्यवाह राजेंद्र कदम, खजिनदार संतोष कुष्टे, मरीनर दिलीप भाटकर, सादिक मुल्ला आणि यास्मीन माखजनकर यांच्यासह सर्व सदस्यांनी नियोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.