''सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च'' परीक्षेत विराजचे यश

''सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च'' परीक्षेत विराजचे यश
Published on

‘सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च’
परीक्षेत विराजचे यश
कडावल ः कुडाळ तालुक्यातील भडगाव-मलाडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विराज लोट याने सिंधुरत्न टॅलेंट सर्च २०२५-२६ या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण प्राप्त करत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची ''गोवा सायन्स सेंटर'' भेटीसाठी निवड झाली आहे. तो दुसरीत शिकत आहे. अभ्यासातील जिद्दीच्या जोरावर त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे. या यशात त्याचे वर्गशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक किसन राठोड व उपशिक्षिका स्नेहा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक किसन राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश लोट व सदस्या लीना लोट, पालक व सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले.
........................
टेंपोचालकाच्या
कोठडीत वाढ
सावंतवाडीः आंबोली घाटात दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात आंबोली फौजदारवाडीतील अकरा अकरा वर्षीय निकिता प्रसाद राऊत हिच्या मृत्यूस व तिची आई सुचिता राऊत हिच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला टेंपोचालक प्रकाश टोयोटा (रा. गुजरात) याला काल (ता. १५) न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. टेंपोचालक प्रकाश टोयोटा याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली होती. पोलिस कोठडीची मुदत काल संपल्याने तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी चालकाला न्यायालयात हजर केले.
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com