सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पौर्णिमेला प्राणी गणना

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पौर्णिमेला प्राणी गणना
Published on

व्याघ्र प्रकल्पात पौर्णिमेला प्राणी गणना
निसर्गप्रेमींना अनोखा अनुभव; सहभागी होण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एक आणि दोन मे रोजी प्राणी गणना केली जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून कानावर पडणारे वन्यप्राण्यांचे आवाज आणि पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी येणाऱ्या तृणभक्षी व हिंस्र प्राण्यांचे दर्शन निसर्गप्रेमींना अनुभवता येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
बुद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाणार आहे. यामध्ये वन्यप्राण्यांचे अस्तित्व, त्यांच्या संख्येत झालेला बदल आणि विलुप्त होणाऱ्या प्रजातींची नोंद घेतली जाईल. वाघांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांत विशेष तयारी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
निसर्गानुभवाचा हा कार्यक्रम विनाअडथळा पार पडावा आणि वन्यप्राण्यांच्या आवागमनात मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी १ आणि २ मे रोजी कोअर, बफर व नियमित पर्यटनक्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांना मुक्त संचार करता येईल. जंगलात घडणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेला शासन किंवा वनविभाग जबाबदार राहणार नाही, याची स्पष्ट कल्पना सहभागींना दिली जाणार आहे.
---
निसर्गप्रेमींना द्यावे लागणार हमीपत्र
हा उपक्रम राबवताना जंगलातील अग्निप्रतिबंधक कामे, शिकार प्रतिबंधक गस्त आणि इतर संरक्षण कामांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत तसेच सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींकडून सुरक्षेच्यादृष्टीने हमीपत्र लिहून घेण्यात यावीत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com