दादर येथे २६ ला रेल्वे परिषद

दादर येथे २६ ला रेल्वे परिषद
Published on

दादर येथे २६ला
रेल्वे परिषद
खेड ः अखंड कोकण रेल्वेप्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या कार्यकारिणी सभेत मांडण्यात आलेल्या संकल्पनेनुसार राज्यस्तरीय महाराष्ट्र रेल्वे परिषद २६ एप्रिलला दादर येथे होणार आहे. राज्यातील रेल्वेप्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका मांडण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः बंद करण्यात आलेल्या गाड्या, शहरांतील मुख्य स्थानकांऐवजी अन्यत्र हलविण्यात आलेल्या सेवा तसेच दीर्घकाळ रखडलेल्या रेल्वेप्रकल्पांबाबत जनजागृती करणे आणि प्रशासनाला ठोस इशारा देणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रवासी संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून संवाद साधला जाणार असून, पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

कर्करोग शिबिराला
खेडमध्ये प्रतिसाद
खेड ः खेड नगरपालिका आणि मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटलतर्फे स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित कर्करोग शिबिरात १५० महिलांची तपासणी करण्यात आली. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. भारती भोईर, डॉ. संप्रिती समंथा, डॉ. मोनिका गुरव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी महिलांना कर्करोगसबंधी माहिती व प्रतिबंध कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात विविध सामाजिक संस्थांमधील महिला सदस्या, शैक्षणिक संस्थांमधील शिक्षिका, बचतगटातील महिलांनी सहभाग नोंदवला. नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी महिलांमध्ये कर्करोग व आरोग्यासंबंधी जागृती करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे स्पष्ट केले.


मंथन परीक्षेत
आर्या कदम प्रथम
खेड ः मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत शिरवली-गुरववाडी शाळेची विद्यार्थिनी आर्या कदमने दुसरीच्या वर्गातून जिल्हा गुणवता यादीत प्रथम क्रमांक तर राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावला. या परीक्षेत तिने १५० पैकी १४० गुण मिळवले. याच शाळेचा माजी विद्यार्थी श्रेयस सुतार याने शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला आहे. निरज साळुंखे व श्रेयस सुतार यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, तर आयुष काणेकर याने ३०० पैकी २१६ गुण प्राप्त केले आहेत. चौथीमधील धीरज साळुंखे हा सुद्धा मंथन ज्ञान परीक्षेमध्ये पात्र झाला आहे.


भडगांवातील मंदिराचा
रविवारी वर्धापनदिन
खेड ः शहराजवळील भडगांव (उसरेवाडी, नक्षेवाडी) येथील श्रीकृष्ण मंदिराचा रविवारी (ता. १९) ग्रामदेवता खेडजाई, रेडजाई, जाखमातेच्या आशिर्वादाने पाचवा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ९.३० ते १०.३० महाभिषेक, ११ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७.३० ते १०.३० महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. १०.३० वाजता नमन आणि वगनाट्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com